रेड बस वर तिकीट बुक केल्या नंतर बस कंपनी कडून त्यांच्या मनमर्जीने बस रूट बदलणे

mayur@123

New member
Hotel Name
-
Company Name
Red Bus
Website Name
www.redbus.in
Customer Care Number
+91 99456 00000
Loss Amount
3150
Ratings
3.00 star(s)
Opposite Party Address
Redbus India Private Limited
Indiqube Leela Galleria,
5th Floor, #No 23, Old Airport Road,
HAL 2nd Stage, Kodihalli Village,
Varthur Hobli, Ward No: 74,
Bengaluru, Karnataka - 560008.
नमस्कार सर

मी मयुर पाटील रा.निंभोरा ता.सोयगाव जि.छ.संभाजीनगर असून कामानिमित्त इस्लामपूर जिल्हा सांगली येथे गेलो होतो . या प्रवासात मी मयुर पाटील व पत्नी साक्षी पाटील प्रवास करणार होतो. रेड बस या अँप च्या माध्यमातून मी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी बुक केले होते. बुक करताना गाडीचा रूट हा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर संभाजीनगर जळगाव असा होता. या नुसार मी पेठ नाक्या वरून आणि माझी पत्नी साक्षी पुणे वरून बसणार होती. सोबतच सिट कोणी घेऊन नये व गैरसोय होऊ नये म्हणून मी रूट बघून दोघांचे तिकीट हे पेठ नाक्या वरून केले. यासाठी पुणे मार्गानेच बस जाईल का याची माहिती घेण्यासाठी रेड बस कडून देण्यात येणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सी सोबत संपर्क केला मात्र त्यांनी मला उत्तर दिले नाही. कॉल कोणताही घेतला नाही. प्रत्येक वेळेस ही बस ह्याच मार्गाने जात असल्याने मी परत संपर्क न करता बस बोर्डिंग पॉइंट वर पोहचलो आणि बस आल्यावर त्यात बसलो मात्र ऐनवेळी ड्रायवर कंडक्टर व वैभव ट्रॅव्हल्स एजन्सी कोल्हापूर यांनी दिवाळी मुळे पुण्यात ड्राफिकच कारण देत रूट बदलत कोल्हापूर कराड लोणंद मोरगाव अहिल्यानगर संभाजीनगर जळगाव हा मार्ग अवलंब केला. ऐनवेळेस सांगितल्या मुळे मी बस मध्ये असल्याने रेड बस तिकीट रिफंड देण्यास नकार दिला. सोबतच ट्रॅव्हल्स एजन्सी सोबत संपर्क केला असता त्यांनी माझे कॉल घेण्यास नकार दिला. ड्रायवर कडून कोल्हापूर येथील ऑफिस नंबर घेतल्या नंतर कॉल केल्याने त्यांनी देखील उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यांनी मला साक्षी यांना तुम्ही लोणंद किंवा अहमदनगर येथे पूर्ण वरून बोलवा आपण तिथे घेऊ असे सांगितले. साक्षी ही एकटी असल्याने रात्री एवढ्या दूर एकटी येऊ शकत नव्हती. यांच्या ऑफिस कडे रिफंड साठी रिक्वेस्ट केली मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. मी वारंवार कॉल केले मात्र कॉल उचलले नाहीत. पुढे माझ्याकडे कोणताही पर्याय नसल्याने कराड येथे बस मधून उतरलो. रेड बस कडे रिफंड साठी विनवणी केली मात्र त्यांनी कोणीही कधीही बस रूट चेंज करू शकते असे सांगून बोलणे टाळले. रागात मी त्यांना काही अपशब्द देखील वापरल्याचे मी मान्य करत आहे. मात्र यांच्या मनमानी कारभारामुळे मला रात्री प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. कराड वरून मला पुणे साठी तिकीट मिळणे कधीं झाले. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसने मी आता पुणे येथे रात्री 2 वाजेल पोहचत आहे.
 
Thank you for reaching out. We noticed that you are facing the similar problem that has already been addressed in a different thread. We kindly request you to please review that thread for the information you’re looking for.


If you still have any questions or need further clarification, feel free to reply here with the specific question that wasn’t answered in the previous thread. Our team will be happy to assist you further.

Thanks
 
Back
Top